
परिषदेची स्थापना
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेची वाटचाल व भूमिका

स्व. डॉ. वि.पां.देऊळगांवकर
संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कलबुरगी
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला सुमारे चौवेचाळीस वर्षांचा इतिहास आहे. १९७९ साली कर्नाटकातील गदग येथील मराठी वाङ्मयप्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी जमलेल्या राज्याच्या विविध भागातील मराठी साहित्यिकांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दि. १४ जानेवारी १९७९ रोजी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद 'या संस्थेची सर्वानुमते स्थापना झाली.परिषदेची स्थापना करताना राज्यात राष्ट्रीय भावैक्य जोपासण्यांबरोबरच कर्नाटकच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवन प्रवाहाशी समरस होऊन कर्नाटक राज्यात मराठी भाषा,साहित्य व संस्कृती टिकवून ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.कर्नाटक राज्य हे या संस्थेचे साहित्यिक कार्यक्षेत्र राहील आणि संस्था मराठी भाषिकांची प्रातिनिधिक संस्था' म्हणून राज्य पातळीवर कार्य करील' करामसापच्या उपक्रमांचा भाग म्हणून संस्थेच्यावतीने कर्नाटकात साहित्य संमेलने घेण्याचे ठरले. त्यानुसार आजपर्यंत अनुक्रमे गदग, गुलबर्गा, माणिकनगर, बीदर,भालकी व औराद या ठिकाणी यशस्वीरित्या साहित्य संमेलने घेतली गेली. परिषदेच्या वतीने संस्थेचे मुखपत्र त्रैमासिक "माझी मराठी"अंक काढला जातो.या त्रैमासिकात कर्नाटकात घडणाऱ्या साहित्यिक घडामोडींचा आढावा घेतला जातो.साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी व विशेष लेख त्यातून प्रसिद्ध केले जातात.
कार्यकारिणी मंडळ

डॉ. दिनकर मोरे
कलबुरगी

मा. बी आर पाटील
आमदार आळंद

कलबुरगी

बाबूराव गायकवाड धारवाड
धारवाड

प्राचार्य विष्णू टी मास्ते
रायचूर

मिलिंद उमाळकर
कोषाध्यक्ष, कलबुरगी

बी. ए. कांबळे
कलबुरगी

प्रा.विजयकुमार चौधरी
सरकार्यवाह, कलबुरगी

इंदुमती सुतार
बिदर

प्रभाकर सलगरे
कार्यवाह, आळंद

डॉ.संध्या राजन अणवेकर
अध्यक्षा ,बेंगळूरू

दिपाली महेश वझे
कार्यवाह, बेंगळूरू

डॉ चंद्रशेखर कपाळे
कलबुरगी

स्व. जे. एन. कदम होळसमुद्र
भालकी

स्व. प्राचार्य भालचंद्र शिंदे
कलबुरगी