top of page
डॉ संध्या रा. अणवेकर

परिचय
संध्या राजन या कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांचे पूर्ण नांव डॉ संध्या राजन अणवेकर आहे. 
संध्या राजन ह्या कर्नाटकाच्या रहिवासी असून बेंगळूरू येथे असतात. अमराठी प्रांतात राहूनही मराठी भाषेवर, साहित्यावर आणि लेखनावर त्यांचे अपार प्रेम आहे. त्या कर्नाटकमध्ये सरकारी सेवेत कार्यरत आहेत.
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद बेंगळूरू विभागाच्या त्या मानद अध्यक्षा आहेत.

 

आतापर्यंत त्यांची एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत-
• ‘नातिचरामी’ (लघुकथासंग्रह)
• ‘चांदवा’ (ललितलेख संग्रह)
• ‘तुला शोधताना’ (कविता संग्रह)
• ‘मी तुझी मीरा’ (कविता संग्रह)
• ‘मनाचा कवडसा’ (कविता संग्रह)
• ‘सातरंगी कमान’ (चारोळीसंग्रह)
आगामी ' “गारवा”' लघुकथा संग्रह आणि 'पणती' कविता संग्रह मुद्रण प्रक्रियेत आहेत.
संध्या राजन  यांना आतापर्यंत खालील पुरस्कार प्राप्त झाले आहेत –
• महाराष्ट्र राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार
• कर्नाटक राज्यस्तरीय उदयोन्मुख लेखिका पुरस्कार
• महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रतिभावंत कवयित्री पुरस्कार

 

संध्या राजन यांच्या लघुकथा आणि कविता ह्या त्यांच्या अनुभवाविष्कारातून साकार झालेले मानवी, कौटुंबिक, सामाजिक आणि दैवी चिंतनसूत्र आहे.  त्यात हताश मनाला आपुलकीचा ओलावा आहे.  जगण्याचा उत्साह आहे.  त्यांचे लिखाण अनुभूतीच्या विभिन्न पैलूतून जीवनातील चढउतार सकारात्मकपणे पाहण्यास उत्तेजित करतात.  वैयक्तिक आणि सामाजिक निराशेपुढे  नीती आणि मूल्यांच्या आशेचा किरण दाखवतात.
 

त्यांच्या लघुकथा आणि कविता महाराष्ट्रातील काही नामवंत दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रांत प्रकाशित झाल्या आहेत. काही निवडक कवितांचे वाचनही यूट्यूबवर रसिकांनी केले आहे. समाजमाध्यमांवर त्या खूप सक्रिय असून त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. 'चारोळी, कविता आणि शायरी तुझीमाझी' ह्या फेसबुकवरील पानावर त्यांचे हजारो वाचक रसिक आहेत.
प्रगल्भता, सहजता, आशयसंपन्नता, सुलभता आणि ओघवती भाषाशैली ही संध्या राजन लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.


संपर्कासाठी पत्ता-
डॉ संध्या रा. अणवेकर
#४, 'मल्लेश्वरम मॅन्शन '
६ वा मुख्य रस्ता , ६वा आडवा रस्ता ,
मल्लेश्वरम, बेंगळूरू-५६० ००३. कर्नाटक राज्य
भ्रमणध्वनी ८०७३७११६११ आणि ९८४४०४६७१९
ईमेल:- drsandhyaanvekar@gmail.com

दिपाली महेश वझे
14.jpeg

नाव - दिपाली महेश वझे,

माहेरचे नाव - दिपाली सुरेश सहस्रभोजनी

जन्म तारीख - ०३-१०-१९८२

शहर - बेंगळूरू

मुळ- माहेरहून - कडी, गुजरात

सासरहून बडौदे, गुजरात

मातृभाषा - मराठी

शिक्षण - १२ सायन्स, कडी गुजरात येथून

ग्रेजुएशन - फर्स्ट क्लास मधे

फाईन आर्टस,

एम एस युनिव्हर्सिटी बडौदे, गुजरात येथून. २००० - २००४

मुख्य विषय - अप्लाईड आर्ट्स

ग्राफिक डिझाईन, लाईव्ह स्केच, लाईव्ह स्टडी, इलस्ट्रेशन्स

फोटोग्राफी, प्रिंटिंग प्रोसेस, चित्रकला, शिल्पकलेचा अभ्यास

नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येथून आयोजित सेमिनार मधे इंटरनेशनल डिझाईनर टीम ICOGRADA BROTHERS २००२ मधे भाग घ्यायची संधी मिळाली.डिझाईन क्षेत्रात भारतातले श्री सुदर्शन धीर यांचे पेकेजिंग डिझाईन वरचे वक्तव्य आयकले. भारताचे प्रसिद्ध कॅलिग्राफर श्री अच्युत पालव यांच्या डिझाईन फर्म मधे २००३ साली काम करायला मिळाले.  महाविद्यालयीन काळात मी केलेले पहिले मुखपृष्ठ एम एस युनिवर्सिटीच्या एन्युअल रिपोर्ट २००३-०४ वर प्रकाशित झाले.

दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद केंद्र, बडौदे मार्फत स्वामी विवेकानंदांचे विचार मांडून जागतिक पोस्टर बनवले आणि विद्यार्थी व पालकांना दिले.

व्यवसाय ग्राफिक डिजाइनर, विझ्युअलाईझर,कॉपी राईटर, क्रिएटिव्ह हेड म्हणून जाहिराती या क्षेत्रात काही वर्ष नोकरी केली.वर्तमान पत्रात पहिल्या पानावर मी बनवलेली जाहिरात यायची. रस्त्यावर जातायेता मी डिझाईन केलेले ज्वेलरी, ओटोमोबाईल चे मोठ मोठे कीओस्क व बेनर्स लागायचे.

 

गुजरातचा न्युझपेपर दिव्य भास्कर तर्फे डिझाईनिंग अवॉड्स २००७ मधे भाग घ्यायची संधी मिळाली.मुलांच्या संगोपनात आणि घरातील ज्येष्ठांच्या सेवेत बाहेर जाऊन नोकरी करणे शक्य नव्हते.अशावेळी थोड्याफार प्रमाणात ग्राफिक डिझाईनींगचे फ्रीलसिंग काम घरूनच करायचे सुरू ठेवले.पुस्तकांचे डिझाईन,ब्रोशर डिझाईन,पॅकेजिंग डिझाईन,वेबसाइट डिझाईन,एप डिझाईन,कॅरेक्टर डिझाईन,टेक्स्टाईल डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन,एक्झिबिशन डिझाईन या क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव आहे.

 

काहीवर्षे परदेशातही होते तेथे त्या भाषेचा अभ्यास नसून बाहेरच्या जगाशी संवाद साधणे अवघड व्हायचे. तेव्हा लहानमुलांचे चित्रकलाचा वर्ग घेणे सुरू केले ते येथे बेंगळूरूलाही शेवटल्या सहा वर्षांपासून चालू आहेत. आपल्या कल्पनाशक्तीच्या आधाराने चित्र, शिल्प घडवायचे शिक्षण, मार्गदर्शन मी माझ्या लहान, मोठ्या विद्यार्थ्यांना देते.

बालपणी घरातले वातावरण आमच्या येथे आई वडील, आजी यांनी सायंकाळची शुभंकरोती, दत्तबावनी, रामरक्षा, मारूती स्तोत्र, गायत्रीचालीसा वगैरे चालीत गायचे. त्यांचे ऐकूनच हे स्तोत्र कंठस्थ झालेत. आई संस्कृतची अभ्यासु असल्यामुळे अडखळलेल्या शब्दांची संधी सुट्टी करून त्याचा अर्थ समजावून सांगायची. बाहेरचं जग गुजराती असल्यामुळे घरात मराठीतच बोलायचा सर्वांचा आग्रह असायचा. बोलताना मधेच गुजराती, हिंदी शब्द आले तर आई त्याचे मराठी शब्दही सुचवायची.आमचे पूर्वज पाच पिढी पासून गुजरातला आहेत.त्यामुळे गुजराती भाषेवर प्रभुत्व आहेच.आईवडीलांनी केलेले संस्कार मराठीत असल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती रक्तात आहे.

 

साहित्य लेखनाची सुरूवात वडिलांच्या आग्रहाने वयाच्या १३-१४ वर्षी रोजनिशी पासून झाली. लेखनाच्या बरोबरीने कविता लिहिणे अवघड वाटायचे पण एक कविता वेग वेगळ्या चालीत गायन करायला मात्र मजा यायची. माझी आजी खरेतर पाठ्यपुस्तकातल्या सर्व कवितांना छानशी चाल लावून द्यायची त्यामुळे सर्व कविता तोंडपाठ असायच्या.आजीने लिहून जपलेल्या भजनाच्या वहीतून भजन म्हणायला आवडू लागले. काही उत्सवानिमित्त आजी बरोबर भजन म्हणायची संधी पण मिळाली तेव्हा आयकणाऱ्यांचे कौतुकाचे शब्द पाठिंबळ द्यायचे. पुढील शिक्षणानिमित्त जेव्हा घरा बाहेर पडले तेव्हा निव्वळ शांती आणि एकलता जाणवायची.व्यक्त होण्यासाठी रोजनिशी लिहायचे,लिहिता लिहिता केव्हा कविता लिहिली गेली कळलेच नाही. कविता “क्या है” ही माझी पहिली कविता २००० साली लिहिली गेली. ज्यात मी हिंदीतून व्यक्त झाले आहे.अजुनही माझ्या वहीत बऱ्याच जुन्या कवितेपैकी पहिल्या पानावरची ती जशीच्या तशी जपली आहे.

साहित्याचा प्रवास २०१७ पासून लेखनाचा छंद म्हणा किंवा व्यक्त होण्याचा नाद म्हणा. रोजबरोजची लेखनाची वही भरण्यापेक्षा त्या कायम स्वरूपी टिकवण्यासाठी आणि वहीत सीमित न राहता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 2017 साली मी कवितेचा ब्लॉग तयार केला. त्यावर सातत्याने कविता पोस्ट करायचे. त्यानंतर वॉट्सएटवर व सोशियल मिडियावर मराठी, हिंदी, गुजराती कवितेचे पेजेस वरून कविता पोस्ट करू लागले.

 

लॉकडाउनच्या सुमारास 2020 साली बेंगळूरू च्या मराठी साहित्यिक समुह व इतर साहित्यिक समुहामार्फत कविता लेखन, ओनलाईन कार्यशाळा, ओनलाईन सादरीकरण वगैरे उपक्रमात जोमाने भाग घेतला तेव्हा खऱ्या अर्थाने चारोळी, पंचाक्षरी, अष्टाक्षरी, अभंग ते गझल पर्यंतची साहित्यिक वाटचाल सुरू झाली.

 

बी.एम.साहित्यप्रेमी बेंगळूरू चा पहिला दिवाळी अंक २०२०  तसेच साहित्य कलामंच दिवाळी अंक २०२१याचे संपूर्ण डिझाईन, मुखपृष्ठावरचे चित्र, लोगो डिझाईन, आतल्या पानांवर कथाचित्र, शब्द कोडे, चित्र कोडे, लेख, कथा, चारोळ्या, गझलेचे पेज सेटिंग्ज आणि सजावटीचे काम केले. वैविध्यपूर्ण दिवाळीअंक काढून बेंगळूरू व महाराष्ट्र बाहेर च्या मराठी साहित्यिकांना एकत्रित करून मराठी साहित्याचे पाऊल मांडले.गझल प्राविण्य ईबुक चे मुखपृष्ठ डिझाईन आणि इतर साहित्यिक व गझलकारांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ डिझाईन केले.

गझलेचा प्रवास २०२० पासून गझलमंथन समुहावर आदरणीय गुरू माई श्रीमती उर्मिलाताई बांदविलकर कडून ओनलाईन गझलेची बाराखडी व गझलेचे तंत्र शिकले. मराठी शब्दकोश, व्याकरणाचा अभ्यास केला.श्री प्रविण पुजारी सरांकडून तंत्रशुद्ध गझल लिहिण्याचे मार्गदर्शन घेतले तेव्हा वेगवेगळ्या उपक्रमातून गझलेचे नियमही अवगत झाले.सुरूवातीला सुरेश भटांनी लिहिलेल्या गझलेचा अभ्यास करत असायचे. त्यानंतर श्रीकृष्ण राऊत सर, इकबाल सर, ए.के शेख सर,शिवाजी काळे सर,सुधाकर इनामदार यांच्या कडून गझलेचा मंत्र जाणण्याचा प्रयत्न केला जो आजपर्यंत चालू आहे. मला माहित आहे की न संपणाऱ्या गझलेच्या अविरत प्रवासात मिळणारा अनुभव खूप आगळा वेगळा आहे. जीवनाचा पैलू उलगडणारा आहे.

 

माझे पहिले पुस्तक काळजाची सहल यात मानवी मनाच्या भावना माझ्या काळजातून सहज व्यक्त झाल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर जीवनाचे विविध रंग माझ्या काळजातून रसिकांपर्यंत पोहोचण्याचा एक निरागस प्रयत्न केला आहे.गझल संग्रहाचे काम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. मुखपृष्ठ व संपूर्ण डिझाईन मी स्वतःच केलेले आहे. उपयुक्त वेळ काढून लवकरच पुस्तक प्रकाशित करण्याचे प्रयोजन आहे.

 

साहित्य पुरस्कार -

निमंत्रित कवी म्हणून महाकवी कालिदास जयंती निमित्ताने"महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे,तर्फे राजस्तरीय काव्य पुरस्कार २०२३ दिग्गजांच्या हस्ते मिळाला.सोशियल मिडियावर मी लिहिलेल्या दोन ओळींवर जाहेर जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हेही माझ्यासाठी एका पुरस्कारा पेक्षा कमी नाही. वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविसंमेलनात सहभाग.कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी या संस्थेच्या बंगळुरू विभाग शाखेच्या कार्यवाह म्हणून कार्यरत आहे.

 

Dipali Mahesh Vaze

B 206, Brigade lakefront,

Near Graphite India, EPIP Zone,

Whitefield Bangalore pin-560066

कर्नाटक राज्यमराठी साहित्य परिषदकलबुरगी

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी. ५८५१०२

+91 - 9731082929

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram

आर्थिक मदतीसाठी

धनादेश या नावाने काढावा:

KARNATAKA RAJYA MARATHI SAHITYA PARISHAD

NEFT/RTGS करिता बँकेचे तपशील:

Bank Name:

SHRI SHIVAJI MAHARAJ SAHAKARI BANK NIYAMITH KALABURAGI-585102.

Account Number: 020020120000475

IFSC Code: UTIB0SCSMSB

©2024 All rights reserved

Designed and maintained by Anita Kadam

bottom of page